राज्यातील करोनाची लाट रोखण्यासाठी टाळेबंदीच्या माध्यमातून सरकारने कठोर निर्बंध लागू केले असले तरी विविध भागांत रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र गुरुवारी होते. लोकांनी घरात थांबावे अन्यथा येत्या दोन दिवसांत निर्बंध अधिक कडक केले जातील. त्यानुसार भाजी मंडई, किराणा

विक्रे ते तसेच पेट्रोल विक्रीवर निर्बंध आणण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचा इशारा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. हा वडेट्टीवार यांचा प्रस्ताव असून, मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो मान्य केलेला नाही.

राज्यात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोक रस्त्यांवर फिरत असून मंडईतही गर्दी होत आहे. टाळेबंदीचा पहिल्या दिवशी फारसा परिमाण न दिसल्याने आता आणखी निर्बंध लागू करण्याची तयारी सरकारने सुरू के ली आहे. त्याबाबत दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणाार असून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली.