19 January 2018

News Flash

कॅटचा निकाल जाहीर

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या व्यवस्थापन शिक्षणातील देशातील अग्रगण्य केंद्रीय संस्थेतील प्रवेश निश्चित करणाऱ्या केंद्रीय सामाईक प्रवेश (कॅट) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यंदा

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 10, 2013 4:59 AM

१०० पर्सेटाईलमध्ये मुंबईचे दोन विद्यार्थी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या व्यवस्थापन शिक्षणातील देशातील अग्रगण्य केंद्रीय संस्थेतील प्रवेश निश्चित करणाऱ्या केंद्रीय सामाईक प्रवेश (कॅट) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यंदा प्रथमच ही परीक्षा संगणकाच्या आधारे घेण्यात आली होती. ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर, २०१२ दरम्यान झालेल्या कॅटला देशभरातून १ लाख ९१ हजार ६४२ विद्यार्थी बसले होते. १०० पर्सेटाईल मिळविण्याची कामगिरी यापैकी दहा विद्यार्थ्यांनी करून दाखविली असून त्यापैकी दोघे मुंबईतील आहेत.
आयआयएममध्ये प्रवेश निश्चित करण्यात सालाबादप्रमाणे यंदाही अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. ९९ ते ९९.९९ पर्सेटाईल मिळविणाऱ्यांमध्ये एक हजार ७५१ इतके विद्यार्थी आहेत. ही संख्या इतक कोणत्याही विद्याशाखेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. १०० पर्सेटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत मुंबईतील हरेश्वर सुब्रह्मण्यम याचा समावेश आहे. हरेश्वर मुंबई-आयआयटीत एरोस्पेस शाखेच्या शेवटच्या वर्षांला आहे. कॅटच्या निकालामुळे आपल्याला सुखद धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
दिल्ली विद्यापीठातून विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. या अभियांत्रिकी पदवीधरांपैकी आठजण आयआयटीयन्स आहेत हे विशेष. यापैकी चौघेजण पदवीच्या शेवटच्या वर्षांला आहेत. ९९.९९ पर्सेटाईल मिळविणाऱ्यांमध्ये चार मुली आहेत. कर्नाटक, ओरिसा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील या चारही मुली अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला आहेत. ९९ पर्सेटाईलपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांमध्ये २५५ मुली तर १,६४० मुलगे आहेत.
आयआयएस-कोझीकोड सारख्या संस्थांनी मुलींचा व्यवस्थापन शिक्षणातील टक्का वाढावा यासाठी दिलेल्या सवलतींचा परिणाम यंदाच्या निकालांवर दिसून आला आहे. त्यामुळे, या वर्षी मुलींच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झालेली दिसते, असे आयआयएम-कोझीकोडचे संचालक देबाशीष चॅटर्जी यांनी सांगितले.
    

First Published on January 10, 2013 4:59 am

Web Title: result of cat announce
  1. No Comments.