25 November 2020

News Flash

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर

परीक्षांनंतर १५ दिवसांत निकाल जाहीर होऊ लागले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या नियमित आणि फेरपरीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी २० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.

परीक्षा लांबल्यामुळे निकाल, शैक्षणिक वर्ष यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परीक्षांचे नियोजन विद्यापीठाने महाविद्यालयांकडे सोपवले. फेरपरीक्षा (बॅकलॉग) २५ सप्टेंबरपासून, तर नियमित परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. परीक्षांनंतर १५ दिवसांत निकाल जाहीर होऊ लागले आहेत. शुक्रवारी जाहीर झालेले २० परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

‘उर्वरित परीक्षांचे गुण संकेतस्थळावर प्रसारित करण्याची प्रक्रिया महाविद्यालयांमध्ये सुरू असून, उर्वरित परीक्षांचे निकालही लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

कोणकोणते निकाल?

बीकॉम सत्र ५ (सीबीसीएस), बीकॉम अकाऊन्ट अँड फायनान्स सत्र ६ आणि सत्र ५, बीकॉम बँकिंग अँड इन्श्युरन्स सत्र ६ आणि सत्र ५, बीफार्म सत्र ७ आणि सत्र ८, टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ५ आणि सत्र ६ (सीबीसीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र ५, बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र ५, टीवाय बी कॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र ५, टीवाय बी कॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५, टीवाय बी कॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र ५, बीएस्सी एव्हिएशन सत्र ५, टीवाय बीकॉम/ बीएमएस एन्व्हायर्न्मेंटल मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स सत्र ५ बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र ५, तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सत्र १ आणि सत्र २.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:37 am

Web Title: results of mumbai university examinations announced abn 97
Next Stories
1 ‘रिपब्लिक’विरोधात आणखी एक गुन्हा
2 अमेरिकेच्या टेस्ला कंपनीला महाराष्ट्राकडून आमंत्रण
3 महापारेषणमध्ये ८,५०० पदांची भरती
Just Now!
X