मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असले तर अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. जवळपास शंभर परीक्षांचे निकाल रखडले आहेत.

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा गेल्याच महिन्यात झाल्या. पुढील सत्र परीक्षांची तयारीही सुरू झाली. मात्र, अद्याप अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी, पुढील शिक्षणासाठी अर्ज करण्यात अडचणी येत आहेत. जवळपास शंभर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल रखडले असून आतापर्यंत २८३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असले तरी विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.

‘पदव्युत्तरचे प्रवेश करायचे असल्यामुळे प्राधान्याने पदवी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले. सध्या पदव्युत्तरचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. रोज सधारण दहा ते बारा निकाल जाहीर होतात,’ असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.