News Flash

निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या पत्नीला एक लाखाचा गंडा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रोर दिली.

निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या पत्नीला एक लाखाचा गंडा

मुंबई : ऑनलाइन खरेदी के लेले कपडे नापसंत पडल्याने परत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या निवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या पत्नीला भामटय़ांनी एक लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दक्षिण मुंबईत वास्तव्यास असलेल्या महिलेने गेल्या आठवडय़ात ई-कॉमर्स संके तस्थळावरून एक हजार रुपये किमतीचा ड्रेस विकत घेतला. किं मत क्रेडिट कार्डद्वारे अदा के ली. ऑनलाइन पाहिलेला आणि प्रत्यक्ष हाती पडलेल्या ड्रेसमध्ये फरक असल्याने महिलेला तो नापसंत पडला. तो परत करण्यासाठी महिलेने संबंधित ई-कॉमर्स कं पनीच्या ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्र मांक गूगलद्वारे मिळवला. त्यावर संपर्क साधला असता समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने एक लिंक महिलेला पाठवली. त्यातील तपशील भरून देण्याची विनंती के ली. तपशिलांमध्ये क्रेडिट कार्डशी निगडित माहितीचा समावेश होता. महिलेने ही माहिती भरून देताच पुढल्या काही मिनिटांमध्ये क्रेडिटकार्डद्वारे एक लााख रुपयांचे परस्पर व्यवहार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रोर दिली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 3:12 am

Web Title: retired bank officer wife cheated for one lakh after online shopping zws 70
Next Stories
1 १०० वर्षांचे आजोबा करोनामुक्त
2 टाळेबंदीआधी कामावर असलेल्यांनाच पूर्ण वेतनाचा लाभ
3 प्रथम आणि द्वितीय वर्षांचे निकालही रखडलेलेच
Just Now!
X