28 October 2020

News Flash

निवृत्त पोलीस अधिकारी टी. के. चौधरी यांचे निधन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक तुकाराम तथा टी. के. चौधरी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आयपीएस अधिकारी झालेल्या चौधरी यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख होती. १९६२ मध्ये चीनने आक्रमण केले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आवाहनानुसार चौधरी वायुदलात जवान म्हणून भरती झाले. १९६५ मधील पाकिस्तानविरुद्धच्या लढाईतही त्यांनी सहभाग घेतला. या युद्धानंतर त्यांची सैन्यात ‘शॉर्ट सव्‍‌र्हिस कमीशन’मध्ये कॅप्टन म्हणून निवड झाली. १९७१ च्या युद्धात शकरगड सेक्टरमध्ये त्यांनी भाग घेतला. त्यामुळे परमनंट कमिशनसाठी निवड झाली. मात्र, त्यांनी नागरी सेवा परीक्षा देण्याचे ठरविले.

१९७३ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेत महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड झाली. ३१ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९९७ साली घाटकोपरच्या रमाबाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना घडल्यानंतरचा सामाजिक उद्रेक शांत करण्यात, दलित समाजाची समजूत काढण्यात चौधरी यांचे योगदान अधिक होते. निवृत्तीनंतर २००४ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षातर्फे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. राजकारणासोबत सामाजिक चळवळी, मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 2:12 am

Web Title: retired police officer t k chaudhary passed away zws 70
Next Stories
1 मेट्रो उद्यापासून सेवेसाठी सज्ज
2 प्रभाग समिती निवडणुकीतील अवैध मतावरून भाजप आक्रमक
3 पावसामुळे हजारो किलो झेंडू वाया
Just Now!
X