20 January 2021

News Flash

पनवेल भूसंपादनप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या कारवाईकडे लक्ष

पनवेल भूसंपादनप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या कारवाईकडे लक्ष

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई :  रायगडमध्ये कवडीमोल दराने भूसंपादन करण्यात आलेली जमीन मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी घेतला होता. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये मुंबई-बडोदा महामार्गाच्या भूसंपादनात मूळ मालकांऐवजी मालामाल झालेल्या दलाल आणि तथाकथित विकासकांच्या व्यवहारांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.

रायगडमध्ये पनवेल, उरण, खोपोली आदी भागांत महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी मोठय़ा प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली होती. तेव्हाही भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध के ला होता. पण दलाल आणि तथाकथित विकासकांनी बडय़ा उद्योगपतीला भूसंपादनात मदत के ली होती. हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही. संपादन के लेली जमीन तशीच पडून होती. पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये महसूलमंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी मूळ मालकांना जमीन परत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला बडय़ा उद्योग समूहाने आक्षेप घेतला होता. तर एका माजी मुख्यमंत्र्याने जमीन परत करण्याच्या निर्णयाच्या विरोधात ओरड के ली होती. मात्र, थोरात हे तेव्हा आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते.

रायगडमध्ये जमिनीचे गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात तेव्हा कारवाईचा बडगा उभारणाऱ्या थोरात यांच्याकडून आताही अपेक्षा आहेत. पनवेलमध्ये मूळ मालकांऐवजी दलाल आणि काही ठेकेदारांनी कोटय़वधींची माया जमा के ली आहे. भूसंपादनाची कुणकुण लागताच या मंडळींनी स्वस्तात जमिनी खरेदी के ल्या असाव्यात.  अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनींचा मोबदला मिळविला असावा. भूसंपादनात मिळणाऱ्या मोबदल्यावर आयकर भरावा लागत नाही आणि काळा पैसा पांढरा होण्यास मदत होते.

रायगडमधील भूसंपादनाबाबत ‘लोकसत्ता‘ने प्रकाशात आणलेल्या व्यवहारांची माहिती मागविली आहे. काही चुकीचे झाले असल्यास नक्कीच कारवाई के ली जाईल.

– बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 3:52 am

Web Title: revenue minister balasaheb thorat action over panvel land acquisition case zws 70
Next Stories
1 ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे निधन
2 शहरात पुन्हा करोना रुग्णांत वाढ
3 अ‍ॅपआधारित टॅक्सींवर अंकुश
Just Now!
X