27 September 2020

News Flash

‘वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करा’

येत्या दहा दिवसांत वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करण्याचा आदेश

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईसह राज्यातील वीज ग्राहकांना उन्हाळ्यातील तीन महिन्यांचे वीज देयक एकत्र आल्यामुळे निर्माण झालेला जनक्षोभ पाहता या वाढीव वीज देयकांची दहा दिवसांत फेरतपासणी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला.

टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज देयकाबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां निवासस्थानी बैठक झाली.  वाढीव वीज देयकांची अचूकता तपासावी. तसेच संबंधित वीज ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करावी आणि हे सर्व झाल्यानंतर प्रत्यक्षात नेमके किती निधीची गरज आहे, याचा लेखाजोखा मांडावा यावर सहमती झाली. त्यानुसार येत्या दहा दिवसांत वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करण्याचा आदेश वीज वितरण कंपन्यांना देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:14 am

Web Title: revise increased electricity payments abn 97
Next Stories
1 काँग्रेसचे आज राज्यभर आंदोलन
2 राज्यसेवेच्या विद्यार्थाना अशक्यतावादाची ‘बाधा’
3 करोनाविरुद्ध लढणारी वैशिष्टय़पूर्ण मोहीम -मुख्यमंत्री
Just Now!
X