30 September 2020

News Flash

कळंबोलीतील रिक्षाचालकांना मारहाण

कामोठे थांब्यावरील रिक्षाचालकांना शुक्रवारी सायंकाळी १०-१५ तरुणांनी मारहाण केली. याविषयी रिक्षाचालक अशोक दगडे, कैलास जवळे, दिलीप घनवट, सुखदेव चौधरी व शंकर जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार

| April 4, 2015 04:20 am

कामोठे थांब्यावरील रिक्षाचालकांना शुक्रवारी सायंकाळी १०-१५ तरुणांनी मारहाण केली. याविषयी रिक्षाचालक अशोक दगडे, कैलास जवळे, दिलीप घनवट, सुखदेव चौधरी व शंकर जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
तीन आसनी रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी वाहतूक व स्थानिक पोलिसांकडे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक वाहनांची लेखी तक्रार केली होती, त्यानंतर ही घटना घडली.  कळंबोली हायवे ते खारघर रेल्वेस्थानक या पल्ल्यावर तीन आसनी रिक्षा शेअर पद्धतीने प्रवासी वाहतूक करतात. त्याच पल्ल्यावर मॅजिक वाहने अवैधरीत्या चालत असल्याचे तीन आसनी रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. याच वादातून ही मारहाण झाली असावी, असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2015 4:20 am

Web Title: rickshaw driver beaten in kalamboli
Next Stories
1 डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
2 आता सेट टॉप बॉक्स पोर्टेबिलिटीचा पर्याय!
3 रेल्वेचे कृषी उत्पन्न : ४०० एकरांवर २० लाख!
Just Now!
X