25 September 2020

News Flash

अंबरनाथमध्ये खड्ड्यांच्या निषेधार्थ ‘रिक्षा बंद’

अंबरनाथ शहरातील खराब रस्ते दुरुस्ती करण्यासंबंधी वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हजारो रिक्षाचालकांनी रविवार मध्यरात्रीपासून रिक्षा बंद आंदोलन सुरू केले.

| October 1, 2013 12:11 pm

अंबरनाथ शहरातील खराब रस्ते दुरुस्ती करण्यासंबंधी वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हजारो रिक्षाचालकांनी रविवार मध्यरात्रीपासून रिक्षा बंद आंदोलन सुरू केले. सोमवारी सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे मात्र या आंदोलनामुळे हाल झाले. दरम्यान, रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर खडबडून जाग आलेल्या नगरपालिका प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले.
अंबरनाथ शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांवर दररोज नव्या खड्डय़ांची भर पडत आहे. या संदर्भात, वारंवार तक्रारी करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने जोशी काका रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी रविवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद आंदोलन सुरू केले. यामध्ये शहरातील सुमारे दहा हजार रिक्षाचालक सहभागी झाले होते.
अचानकपणे करण्यात आलेल्या या बंदमुळे सोमवारी कामावर निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यामुळे खडबडून जाग आल्याने नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या दालनात पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. तसेच डांबरीकरणाचे काम आठवडाभरात सुरू होईल, असे लेखी आश्वासन
मुख्यधिकारी भालचंद्र गोसावी यांनी दिले. त्यानंतर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले.
दिवसेंदिवस महागाई वाढत असतानाच शहरातील रस्त्यांवरील रिक्षा दुरुस्तीची कामे वारंवार करावी लागतात. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यातून प्रवाशांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे रामदास पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 12:11 pm

Web Title: rickshaw strike roll back after promise on pothole in ambernath
Next Stories
1 सुधारित ‘पुणे मेट्रो’ प्रस्तावास मान्यता
2 बेस्ट बसच्या धडकेत घाटकोपर येथे पादचाऱ्याचा मृत्यू
3 डोंबिवली- कल्याणातील जिने ऑक्टोबरमध्येच ‘सरकणार’
Just Now!
X