26 February 2021

News Flash

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा फेरविचार करा

परिणामी रिक्षा, टॅक्सीचा वापरही मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : रिक्षा-टॅक्सीच्या भाडेदरात १ मार्चपासूून वाढ करण्याच्या निर्णयानंतर मुंबई ग्राहक पंचायत सरसावली असून भाडेवाढीचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी पंचायतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांना मागणी पत्र पाठविले आहे. करोनामुळे अर्थचक्र  ठप्पच झाले असून बहुसंख्य सर्वसामांन्य नागरिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे ही भाडेवाढ ग्राहकांच्या हालअपेष्टांमध्ये भर घालणारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाडेदरात तीन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये होणार आहे. तर पुढील टप्प्यातही वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. परिणामी रिक्षा, टॅक्सीचा वापरही मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच परिस्थिती पाहता भाडेवाढ करूनये, अशी मागणी केल्याचे ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तीन पर्यायही सुचवण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारची भाडेवाढ योग्य नसल्याने रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ सहा महिने पुढे ढकलता येईल.

ग्राहकांनाही ही दरवाढ सुसह्य होईल याची काळजी घ्यावी. म्हणून सदर भाडेवाढ दोन टप्प्यांत करून १ मार्चपासून पुढील वर्षासाठी रिक्षा, टॅक्सीच्या मूळ भाड्यात एक रुपया वाढ आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ पैसे वाढ लागू करावी. उर्वरित भाडेवाढ एक वर्षाच्या कालावधीनंतर करावी असा दुसरा पर्याय असल्याचे ते म्हणाले. तिसऱ्या पर्यायात केवळ मूळ भाड्यात दोन रुपये सरसकट भाडेवाढ करून पुढील प्रति किलोमीटर २ रुपये १ पैसा आणि २ रुपये ९ पैसे ही दरवाढ येत्या वर्षभरासाठी स्थगित करण्याची सूचना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:07 am

Web Title: rickshaw taxi fare hike akp 94
Next Stories
1 अरीब माजिदचा जामीन कायम
2 सांगलीतील सत्तांतर हा आघाडीच्या एकजुटीचा विजय
3 मोहन डेलकर यांच्या चिठ्ठीभोवती तपास केंद्रीत
Just Now!
X