News Flash

मुंबईत आजपासून रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ

रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरुन २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये

(संग्रहित छायाचित्र)

काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सीतून सोमवार १ मार्चपासून प्रवास करणाऱ्या मुंबई महानगरातील प्रवाशांना नवीन भाडेदर द्यावा लागणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनंतर सोमवारपासून दोन्ही सेवांच्या किमान भाडेदरात प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरुन २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये होईल. परिणामी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नवीन भाडेदरासाठी रिक्षा,टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल करावे लागणार असल्याने त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत चालक भाडेदरपत्रकानुसारच प्रवाशांकडून भाडे वसुल करतील.

मुंबई महानगरातील ज्या भागात मीटर रिक्षा व टॅक्सी धावतात त्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलहीसह अन्य हद्दीत ही वाढ लागू असेल. गेल्या पाच वर्षांत रिक्षा-टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्यात आलेली नाही. शिवाय करोनाकाळातही व्यवसाय कमी झाल्याने त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे वाहनांची सरासरी किं मत, विम्याचा हफ्ता, मोटर वाहन कर, व्यवसाय कर,ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर इत्यादी बाबी विचारात घेऊन खटुआ समितीच्या शिफारशींनुसार परिगणना करुन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने नवीन भाडेदर लागू के ली आहे. वर्षांतून एकदा जून महिन्याच्या पहिल्या तारखेस भाडेदरात सुधारणा करावी, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली असून ती देखिल लागू होणार आहे. मुंबई महानगरात सध्या ४ लाख ६० हजार रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी आहेत.

काळी पिवळी टॅक्सी दर (सीएनजी) (दिवसाचे भाडेदर)

किमी    सध्याचे दर     वाढीव दर

१.५०       २२ रु          २५ रु

२.५०       ३७ रु           ४२ रु

३.५०       ५२ रु           ५९ रु

४.५०       ६७ रु           ७६ रु

५.५०        ८२ रु           ९३ रु

(रात्री १२ पासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरुवातीच्या दिड किलोमीटरसाठी २८ रुपयांऐवजी ३२ रुपये भाडे द्यावे लागेल)

काळी-पिवळी रिक्षा दर (सीएनजी) (दिवसाचे भाडेदर)

किमी    सध्याचे दर     वाढीव दर

१.५०      १८ रु            २१ रु

२.५०     ३० रु              ३६ रु

३.५०     ४३ रु              ५० रु

४.५०     ५५ रु              ६४ रु

५.५०     ६७ रु              ७८रु

(रिक्षाचे रात्री १२ पासूनचे किमान दिड किलोमीटरचे भाडे २३ रुपयांवरुन २७ रुपये होईल)

सोमवारपासून नवीन भाडेदर लागू होणार आहेत. मात्र रिक्षा व टॅक्सींच्या मीटरमध्ये नवीन भाडेदर बदल करण्यास मे २०२१ पर्यंतचा कालावधी चालकांना परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. बदल होईपर्यंत चालक नवीन दरपत्रकानुसार प्रवाशांकडून भाडे घेऊ शकतील.

कुल कॅबचेही भाडे वाढणार

काळ्या-पिवळ्या टॅक्सींबरोबरच कुल कॅबचेही भाडे सोमवारपासून वाढणार आहे. त्याच्या किमान भाडेदरात पाच रुपयांनी वाढ केली आहे. याआधी कुल कॅबचे दिवसा दिड किलोमीटरसाठीचे किमान असलेले २८ रुपये भाडे ३३ रुपये आणि तर रात्रीचे भाडे ३५ रुपयांवरुन ४२ रुपये होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:34 am

Web Title: rickshaw taxi fare hike in mumbai from today abn 97
Next Stories
1 चेंबूरमध्ये करोना रुग्णावर गुन्हा दाखल
2 बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ
3 मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’