ज्यातील सिंचन गोटाळ्याची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा करताना विधीमंडळात दिलेले आश्वासन न पाळल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांच्यावर हक्कभंग दाखल केला.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सिंचन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्र्यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश काढताना विशेष अन्वेषण पथका ऐवजी विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. हा सदनाचा अवमान असल्याचे सांगत खडसे यांनी हक्कभंग दाखल केला आहे.