News Flash

शो सुरू असतानाच २४ वर्षीय रेडिओ जॉकीचा ह्रदयविकाराने मृत्यू

लाईव्ह रेडिओ शो दरम्यान आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला.

RJ SHUBHAM: शुभम हा नागपूर येथील ९८.३ एफएम वाहिनीत आरजेचे काम करत होता. रोज सकाळी ७ ते ११ त्याचा 'हाय नागपूर' हा शो असतो.

नागपूर येथे लाईव्ह रेडिओ शो दरम्यान २४ वर्षीय रेडिओ जॉकीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. शुभम केचे असे या आरजेचे नाव असून गुरूवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
शुभम हा नागपूर येथील ९८.३ एफएम वाहिनीत आरजेचे काम करत होता. रोज सकाळी ७ ते ११ त्याचा ‘हाय नागपूर’ हा शो असतो. गुरूवारी नेहमीप्रमाणे हा शो सुरू असताना तो ९.३० च्या सुमारास ब्रेकदरम्यान स्वच्छतागृहात गेला. ब्रेक उलटून गेल्यानंतरही तो न परतल्याने स्टुडिओतील त्याच्या सहकाऱ्यानी त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत स्वच्छतागृहात आढळला. त्याला लगेचच रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऐन उमेदीच्या काळातच शुभमने एक्जिट घेतल्याने नागपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त लवकरच..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2016 4:54 pm

Web Title: rj shubham keche died between live show
Next Stories
1 पालिकेत खरंच माफियाराज आहे का ?, महापौरांचा आयुक्तांना सवाल
2 शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार- सूत्र
3 चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये दादागिरी करणाऱ्या टोळक्याला आरपीएफच्या जवानांचा चोप
Just Now!
X