News Flash

रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करणार

नगरपालिका-महानगरपालिका क्षेत्राबाहेरील रस्ते-पूल-इमारतींच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

देशातील तीन मे पर्यंतच्या टाळेबंदीच्या काळात २० एप्रिलपासून नगरपालिका-महानगरपालिका हद्दीबाहेरील रस्त्यांची कामे करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे आता आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा प्राधान्यक्र म ठरवणार असून पावसाळा दीड महिन्यांवर आल्याने राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मात्र तातडीने हाती घेणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

करोनाच्या साथीमुळे देशातील टाळेबंदी तीन मेपर्यंत वाढवण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिलपासून सुरक्षित भागांमध्ये काही प्रमाणात विविध उद्योग-कामे सुरू करण्यासाठी शिथिलता देण्याचे संके त दिले होते. त्यानुसार के द्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी एक पत्राद्वारे कोणती कामे सुरू करता येतील याची यादी जाहीर केली. त्यात नगरपालिका-महानगरपालिका क्षेत्राबाहेरील रस्ते-पूल-इमारतींच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्यातील रस्त्यांचे काम मोठय़ाप्रमाणात आहे. मात्र, त्याचबरोबर मार्चपासून सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे महसूल आटल्याने राज्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले असल्याने निधीची मर्यादा येणार आहे. हे वास्तव लक्षात ठेवून प्राधान्यक्र म ठरवण्यासाठी बैठक घेणार आहे. मात्र पावसाळा तोंडावर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य देऊन ती कामे तातडीने सुरू करण्यात येतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. त्यातून हातावर पोट असणाऱ्या मजुरांनाही काम उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:43 am

Web Title: road work will start immediately abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तासन्तास उपाशीपोटी रुग्णसेवेचे व्रत
2 काळजी घ्या! मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या २ हजारांच्या जवळ
3 प्रश्न तुमचा, उत्तर महापालिका आयुक्तांचं; लोकसत्ताच्या व्यासपीठावर
Just Now!
X