News Flash

चोरीच्या इराद्याने ओशिवऱ्यात महिलेची हत्या

महिलांच्या सुरक्षेबद्दल शहरात बरीच चर्चा सुरू असतानाच ओशिवरा भागात एका महिलेचा तिच्या राहत्या घरीच खून झाला. या महिलेचा पती घरी नसताना चोराने तिच्या घरात घुसून

| April 12, 2013 03:52 am

महिलांच्या सुरक्षेबद्दल शहरात बरीच चर्चा सुरू असतानाच ओशिवरा भागात एका महिलेचा तिच्या राहत्या घरीच खून झाला. या महिलेचा पती घरी नसताना चोराने तिच्या घरात घुसून दागिने चोरण्याच्या प्रयत्न केला. त्या वेळी या महिलेने विरोध केला असता त्याने गळा आवळून तिची हत्या केली. या चोरटय़ाने ३०० ग्रॅम वजनाचे ९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील गादी व इतर साहित्य यांना आग लावली. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
ओशिवरा ग्रीनपार्क को. ऑप. हौसिंग सोसायटीत राहणारे सुनील दरेकर बुधवारी काही कामानिमित्त चेंबूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी सुषमा दरेकर (४०) या एकटय़ाच घरात होत्या. ही संधी साधून एक चोर त्यांच्या घरात घुसला. त्याने सुषमा यांचा गळा आवळून त्यांना ठार केले. त्यानंतर त्यांचे मंगळसूत्र, दोन बांगडय़ा, एक हिऱ्याची अंगठी, कर्णफुले, दोन सोन्याच्या बांगडय़ा, सहा पाटल्या, मोठे मंगळसूत्र, कुडीसर, सोन्याचा हार, दोन सोन्याच्या अंगठय़ा असे ३०० ग्रॅम वजनाचे आणि ९ लाख रुपये किमतीचे दागिने चोराने चोरून नेले. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस या अज्ञात चोराचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 3:52 am

Web Title: robber killed women in oshiwara
Next Stories
1 आणखी एका ‘महिला विशेष’गाडीची मागणी
2 घृणास्पद आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार – राज ठाकरे
3 ‘तर सरकारला पळता भुई थोडी करू’!
Just Now!
X