News Flash

ह्रतिकने उदघाटन केलेल्या ज्वेलरी दुकानात पहिल्याच दिवशी चोरी!

अभिनेता ह्रतिक रोशनच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या जॉयआलुक्कास या ज्वेलरी दुकानात पहिल्याच दिवशी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

| January 9, 2014 06:38 am

अभिनेता ह्रतिक रोशनच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या जॉयआलुक्कास या ज्वेलरी दुकानात पहिल्याच दिवशी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
तयार दागिनेनिर्मितीतील आंतराष्ट्रीय नाममुद्रा असलेल्या जॉयआलुक्कासच्या मुंबई परिसरातील दोन नव्या दालनांचे उदघाटन अभिनेता आणि कंपनीचा राजदूत ह्रतिक रोशन याच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे ह्रतिकला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. याचाच फायदा घेत दोन स्त्रिया आणि एका पुरूषाने दोगिने खरेदी करण्याचे नाटक केले. काही दागिने चाचपले आणि कुणाचेही लक्ष नसल्याचे पाहून चोरट्यांनी जवळपास ४ लाखांचे दागिने लंपास केले.
चोरी झाल्याची बाब लक्षात येताच दुकानाच्या संचालकांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि त्यात दोन महिला व एक पुरूष दागिने लंपान करत असल्याचे दिसून आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलुंड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांना चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 6:38 am

Web Title: robbery attempt at joy alukkas jewellers
टॅग : Robbery
Next Stories
1 मोठा आवाज.. विचित्र वास
2 कुलगुरूंची कोंडी!
3 मुख्यमंत्री विरुद्ध मंत्रिमंडळ!
Just Now!
X