अंधेरी येथील इन्फिनिटी मॉलमधील एका सराफाच्या दुकानातून ४७ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शुक्रवारी उघड झाली. दहिसर पूर्व येथील रहिवाशी राजेशकुमार मोतीकांत झा (४५) यांचे इन्फिनिटी मॉलमध्ये तळमजल्यावर दागिन्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या दुकानातून आठ लाख रुपयांचे हिरेजडित दागिने, दीड लाख रुपयांची सोन्याची नाणी, सव्वालाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रोख असा एकून ४७ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.