04 August 2020

News Flash

भर दुपारी रेल्वेत प्रवाशांना लुटले

हार्बर मार्गावरील पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सोमवारी दुपारी येणाऱ्या रेल्वे गाडीतील चार प्रवाशांना सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक जवळ येताच चाकूचा धाक दाखवून लुटण्यात

| November 11, 2014 02:20 am

 हार्बर मार्गावरील पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सोमवारी दुपारी येणाऱ्या रेल्वे गाडीतील चार प्रवाशांना सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक जवळ येताच चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. प्रवाशांकडील मोबाइल आणि रोख रक्कम घेऊन लुटारुंनी पोबारा केला. या झटापटीत एक प्रवाशी जखमी झाला. या घटनेमुळे उपनगरीय रेल्वेतील प्रवासही असुरक्षित झाल्याचे उघड झाले आहे.
पनवेलवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने निघालेली  रेल्वेगाडी दुपारी ३.१५ च्या सुमारास सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ येताच काही अज्ञात लुटारुंनी चाकूचा धाक दाखवून गाडीतच बसलेल्या चार प्रवाशांकडील मोबाइल आणि रोख रक्कम काढून घेतली. यावेळी एका प्रवाशाच्या हाताला चाकू लागला आणि तो जखमी झाला. हे प्रवाशी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर उतरले आणि त्यांनी पुढच्या डब्यातील प्रवाशांना घटनेची माहिती दिली. रेल्वे स्थानकावरील महिला पोलिसाने या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2014 2:20 am

Web Title: robbery in mumbai local train
Next Stories
1 विधानभवनात ‘जय शिवाजी’ विरुद्ध ‘जय श्रीराम’ घोषणाबाजी
2 मराठी शाळा, ऐच्छिक उर्दू, खडसेंना हिरवी टोपी
3 कॉंग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी राधाकृष्ण विखे-पाटील
Just Now!
X