News Flash

पोलिसाच्याच घरात चोरी

चोरटय़ांच्या मागावर सदैव असणाऱ्या पोलिसाच्याच घरात चोरी झाल्याची घटना नेहरूनगर परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

चोरटय़ांच्या मागावर सदैव असणाऱ्या पोलिसाच्याच घरात चोरी झाल्याची घटना नेहरूनगर परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरटय़ांनी एक-दोन नव्हे तर चार घरांवर डल्ला मारण्याचे धाडस दाखवले आहे. परंतु, केवळ एकाच घरात चोरटय़ांना ७४ हजार रुपयांचा ऐवज मिळाला असून उर्वरित तीन घरे रिकामी असल्याने चोरटय़ांच्या हाताशी काही लागले नाही. कांजूर मार्ग आणि भांडुप येथील चाळींमध्ये झालेल्या घरफोडय़ांची मंगळवारी उकल झाली असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी थेट पोलिसांच्याच घरावर डल्ला मारला.
नेहरूनगर परिसरात जागृती नगरसमोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार रहिवासी इमारती आहेत. दुसऱ्या माळ्यावर महादेव महाले हे निवृत्त पोलीस कर्मचारी राहतात. महाले गावी गेले होते. बुधवारी पहाटे रहिवाशांनी त्यांचे घर फोडल्याचे पाहिले. पोलिसांनी केलेल्या तपासात ७४ हजार रुपये आणि दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 12:30 am

Web Title: robbery in police house
टॅग : Robbery
Next Stories
1 एकतर्फी प्रेमातून करिश्माची हत्या?
2 कातकरी समाजाची ‘घर’घर संपणार!
3 मोबाइलवर बोलताना लोकलची धडक 
Just Now!
X