चेंबूरमधील सीजी ज्वेलर्सवरच्या दुकानात मंगळवारी पहाटे अज्ञात चोरांनी दुकानाचे मागचे दार उघडून दुकानातील तब्बल ५२ लाखांचे दागिने लंपास केले आहेत. चेंबुरच्या एन. जे. आचार्य मार्गावर अमृत जैन यांच्या मालकीचे सीजी ज्वेलर्स हे दुकान आहे. याच चाळीत दुकानाचे मृत जैन यांचे घरही आहे. सकाळी सव्वासहाच्या सुमारास त्यांच्या पत्नी मंजुबेन दुकानात आल्या असता त्यांना दुकानाचे मागील दार तोडलेले आढळले. दुकानातील एकूण ५२ लाखांचे सोन्याचे दानिगे अज्ञात चोरटय़ांनी लुटल्याचे लक्षात आले. गोवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाच्या मागील बाजूचे दार तोडून चोरांनी आत प्रवेश करुन ही चोरी केली.   चोरीला गेलेला ऐवज दोन कोटींच्या घरात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्वेलर्सचे मालक मुंबईत परतल्यानंतर त्याबाबत अधिक तपशील उपलब्ध होऊ शकणार आहे. या दुकानात सीसीटीव्ही नव्हता. इमिटेशन ज्वेलरीला चोरांनी हात लावला नाही. त्यामुळे चोर माहितगार किंवा या व्यवसायातले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी हातांचे ठसे घेतले असून अधिक तपास सुरू आहे