08 August 2020

News Flash

उद्धव ठाकरे सरकारला मोठा धक्का

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाची भूमिका

संग्रहित छायाचित्र

युवासेनेच्या दबावामुळे अंतिम वर्षांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या भूमिके मुळे मोठा धक्का बसला आहे. व्यावसायिक अभ्यासक्र माच्या परीक्षा तर आता होणारच हे स्पष्ट झाले आहे.

करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी आदित्य ठाकरे हे नेतृत्व करणाऱ्या युवासेनेकडून करण्यात येत होती. यानुसार राज्य सरकारने कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा  रद्द करण्याचा निर्णय जाहीर के ला. तसेच अभियांत्रिकी व अन्य व्यवसाय अभ्यासक्र माच्या परीक्षा रद्द करण्यासाठी या अभ्यासक्र माच्या शिखर संस्थांना विनंती के ली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा अनिवार्य असल्याचे नमूद के ल्याने राज्य सरकारला परीक्षा घेण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात कला, विज्ञान व वाणिज्य शाखांच्या परीक्षा टाळण्यावर राज्य सरकारचा भर असेल.

परीक्षांचा विषय ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा के ला होता. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी विरोध दर्शविला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याची भूमिका घेतली असताना राज्य सरकार वेगळी भूमिका कशी घेते, असा सवालही राज्यपालांनी के ला होता. परंतु तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने युवासेनेने परीक्षा रद्द झाल्या पाहिजेत, अशी भूमिका मांडली . आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे शेवटी परीक्षा रद्द करण्याचा आदेश सरकारने काढला.

शिक्षण हा विषय केंद्र व राज्य या दोघांच्या सामायिक सूचीत समाविष्ट (कॉकरन्ट लिस्ट) होतो. शिक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा केंद्र व राज्य या दोघांनाही अधिकार आहे. राज्य सरकारने एखादा कायदा के ला व त्याच अनुषंगाने संसदेने कायदा के ल्यास, राज्याचा कायदा ग्राह्य़  धरला जात नाही. केंद्राने परीक्षा घेण्याची भूमिका घेतल्याने राज्यातही परीक्षा घ्याव्याच लागतील, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे. परीक्षा व्हाव्यात म्हणून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

शिवसेना आणि सरकारचे मौन

परीक्षा घेणे आवश्यक करण्यात आल्यावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काहीही प्रतिक्रि या व्यक्त करण्याचे टाळले. परीक्षा रद्द कराव्यात म्हणून पत्रकबाजी करणारे युवासेनेचे पदाधिकारीही प्रतिक्रि या व्यक्त करण्यास तयार नव्हते. एकू णच राज्य सरकार आणि युवासेना या दोघांनाही मौन बाळगणेच पसंत के ले. दुसरीकडे, परीक्षांचे भवितव्य काय याचा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना सतावत आहे. परीक्षा होणार की नाही हे एकदाचे स्पष्ट करावे, अशीच विद्यार्थ्यांची भूमिका आहे.

युवासेनेच्या दबावामुळे ठाकरे सरकारने लोकप्रिय निर्णय घेतला होता. परंतु त्यातून राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. कारण अन्य राज्यात परीक्षा होणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या वेळी प्रश्न येऊ शकतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा घ्याव्यात.

– विनोद तावडे, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:53 am

Web Title: role of the university grants commission in conducting final year examinations abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७ टक्क्य़ांवर
2 टाळेबंदीदरम्यान राज्यात दीड लाख गुन्हे दाखल
3 चार करोना केंद्रांचे आज उद्घाटन
Just Now!
X