प्रवाशांसाठी काळी-पिवळी टॅक्सी उपलब्ध आहे की नाही हे ‘रुफलाइट इंडिके टर’द्वारे समजणे शक्य होणार आहे. हे इंडिके टर बसवण्याची सक्ती १ जुलै २०२१ पासून करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.

मुंबईत धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या सुमारे ४० हजारांपर्यंत आहे. परिवहन विभागाने परवाने खुले केल्यानंतर त्यांच्या संख्येत थोडी वाढ झाली असली तरीही म्हणावी तशी सेवा अद्यापही प्रवाशांना मिळत नाही. टॅक्सीमध्ये प्रवासी आहे की नाही हे समजत नसल्याने प्रवाशांना बराच खटाटोप करावा लागतो. त्यात गर्दीच्या वेळी तर मोठी पंचाईत होते. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन विभागाने रुफलाइट इंडिके टर बसवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार टॅक्सींच्या वरच्या बाजूला तीन रंगांतील इंडिके टर बसविले जातील. सेवा उपलब्ध असल्यास इंडिके टरवर हिरवा रंग प्रकाशित के ला जाईल. पांढऱ्या रंगात इंडिके टर प्रकाशित झाले तर सेवा बंद असल्याचे समजावे आणि टॅक्सीत प्रवासी असल्यास लाल रंगात इंडिके टर असेल. त्याला वर्षभरापूर्वी अंतिम स्वरूप दिले. त्यासाठी उत्पादकांसोबत बैठका घेण्यात आल्या. मात्र मार्च २०२० पासून करोनाचे संकटामुळे याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२१ पासून करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र करोनाकाळात टॅक्सीचालकांचे बुडालेले उत्पन्न आणि इंडिके टर बसवण्यासाठी चालकाला येणारा दोन रुपयांपेक्षा जास्त खर्च पाहता त्याच्या अंमलबजावणीचा फेरविचार करण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत इंडिके टरची सक्ती १ जुलै २०२१ पासून करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. चालकांचे व उत्पादकांचेही नुकसान होऊ नये यासाठी जुलैपासूनच अंमलबजावणी होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

फेब्रुवारी २०२० पासून त्याची अंमलबजावणी टॅक्सींसाठी करण्याचा निर्णय झाला. तेव्हा मोजक्याच टॅक्सींवर प्रायोगिक तत्त्वावर इंडिके टर बसवले. मार्च महिन्यापासून करोनाची परिस्थिती निर्माण होताच हा विषय मागे पडला.

रिक्षांच्या बाबतीत निर्णय नाही

रिक्षांच्याही टपावर रुफलाइट इंडिके टर बसवण्याचा निर्णय आधी घेतला होता, परंतु त्याचा फे रविचार होत असल्याचेही ढाकणे म्हणाले. रिक्षाची वरची बाजू कापडाच्या प्रकारातील आहे. त्यामुळे इंडिके टर बसवणार कसे, असा प्रश्न असल्याचे सांगितले. तूर्तास त्यावर निर्णय घेतलेला नाही.

करोनामुळे चालकांचे उत्पन्न बुडाले आहे. रुफलाइट इंडिके टर बसवण्यासाठी येणारा खर्च पाहता चालकांना तो परवडणारा नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्याची मागणीच होती.

– ए. एल. क्वाड्रोज, महासचिव, मुंबई टॅक्सिमेन्स युनियन