04 March 2021

News Flash

रेल्वे सुरक्षा जवानाचा सुनेवर बलात्कार

कल्याण पूर्वेतील सिद्धार्थनगरमधील रेल्वे निवासामध्ये राहणारा रेल्वे सुरक्षा दलाचा जवान राकेशकुमार शर्मा (वय ५३) याने आपल्या २४ वर्षीय सुनेवर बुधवारी बलात्कार केला. त्याला पोलिसांनी अटक

| May 10, 2013 04:08 am

कल्याण पूर्वेतील सिद्धार्थनगरमधील रेल्वे निवासामध्ये राहणारा रेल्वे सुरक्षा दलाचा जवान राकेशकुमार शर्मा (वय ५३) याने आपल्या २४ वर्षीय सुनेवर बुधवारी बलात्कार केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलगा पुण्याला गेल्याने घरात सून व सासरा राकेशकुमार होते. दुसऱ्या खोलीत सून टीव्ही पाहात होती. त्या वेळी राकेशकुमार तिच्या खोलीत गेला. त्याने ओरडा होऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा केला. सुनेवर बलात्कार करून नंतर पळून गेला. वेदना असह्य़ झाल्याने सुनेने पोलीस ठाणे गाठले. सुनेने दिलेल्या तक्रारीनुसार सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 4:08 am

Web Title: rpf constable held for raping daughter in law
Next Stories
1 डमी एमबीए प्रवेश परीक्षा प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल
2 ब्रोकर यांच्या जुहूतील बंगल्याचा सौदा ४० कोटींना; करार नऊ कोटींचा!
3 मेल रद्द झाल्याने सीएसटीत धुमाकूळ
Just Now!
X