28 September 2020

News Flash

आत्महत्येची धमकी देणारा ‘आरपीएफ’ जवान ताब्यात

मिश्रा सध्या भाईंदर येथे तैनात आहेत आणि पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार आहेत.

मुंबई सेंट्रल येथील आरपीएफ कार्यालयासमोर आत्महत्या करण्याची धमकी देणारे हेड कॉन्स्टेबल दयाशंकर मिश्रा यांना नागपाडा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. सतत होणाऱ्या बदल्यांमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या ५० वर्षीय दयाशंकर यांनी आपल्याला न्याय मिळाला नाही तर २५ सप्टेंबरला आरपीएफच्या कार्यालयासमोरच आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. ते मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात पोहोचताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मिश्रा सध्या भाईंदर येथे तैनात आहेत आणि पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार आहेत. मात्र गेली काही वर्ष त्यांची ठिकठिकाणी बदली केली जात आहे. याशिवाय, रेल्वे प्रशासनाकडूनही सातत्याने त्रास दिला जात असल्याची त्यांची तक्रार होती. त्यांनी प्रशासनाकडे याबाबतील लेखी तक्रार दिली होती आणि न्याय मिळाला नाही तर आरपीएफ कार्यालयासमोर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 12:21 am

Web Title: rpf jawan arrested by police
Next Stories
1 ब्रिटिशकालीन आठ भूमिगत टाक्या गायब
2 पनवेल महापालिका स्थापनेचा घोळ
3 मंत्रालय परिसरातील जागा पक्षांना सोडवेना
Just Now!
X