23 September 2020

News Flash

“कंगनावर पालिकेने अन्याय केलाय, अधिकाऱ्यांवर कारवाई करा,” आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे - रामदास आठवले

मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत.

“पालिकेने २४ तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई करत नियमाचे उल्लंघन करत कंगनावर अन्याय केला आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तसंच ज्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केला जावी,” अशी मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली.

“करोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. राज्य सरकारने करोनासाठी कठोर पावलं उचलावी असे आदेश राज्य सरकारला द्यावेत,” असंही रामदास आठवले यांनी निवेदनात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 4:35 pm

Web Title: rpi ramdas athavle meets governor bhagat singh koshyari over kangana ranaut row sgy 87
Next Stories
1 ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’मुळे २५ हजार महिलांना सुरक्षित मातृसुखाची अनुभूती!
2 रिया, शोविकचा जामीन अर्ज फेटाळला
3 कंगनाची ड्रग्ज प्रकरणी चौकशी होणार? तपासासाठी ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र
Just Now!
X