आर. आर. पाटील यांची तब्येत गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून तेवढी साथ देत नव्हती, पण त्यांनी ऑक्टोबपर्यंत आजार अंगावर काढला, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हाही त्यांनी कोणालाच त्याची कल्पना दिली नव्हती. कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले याचा शोध पक्षाध्यक्ष शरद पवार यांना घ्यावा लागला होता.
विधानसभा निकालानंतर आर. आर. आबा मुंबईत पक्षाच्या बैठकीसाठी आले, तेव्हा त्यांचा चेहरा सुजलेला होता व गालाजवळ गाठ दिसत होती. तेव्हाच अनेकांनी आबांजवळ विचारणा केली होती. काही दिवसांतच आर. आर. यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २८ ऑक्टोबरला बायप्सी करण्यात आली आणि १४ नोव्हेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असे डॉ. संजय उगेमुगे यांनी सांगितले.
आर. आर. यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती. कोणत्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याची माहिती पक्षाच्या नेत्यांना मिळत नव्हती. शेवटी आर. आर. यांच्यावर ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे शरद पवार यांना समजले. तेव्हा आम्हाला कल्पना का दिली नाही, असे पवारांनी आर. आर. यांना दरडावूनच विचारले होते. शेवटच्या तीन महिन्यांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आर. आर. पाटील यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सारी मदत केली होती. कुटुंबीयांची मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने मंत्रालयासमोरील वसंत डावखरे यांचे शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले होते.

पुस्तकप्रेमी आबा
आबांना पुस्तकांची मोठी आवड होती. राजकारणाच्या धकाधकीत अत्यंत प्रयत्नपूर्वक त्यांनी वाचनाची आवड जोपासली होती. प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी अनेक पुस्तके वाचून काढली होती. सुरुवात केली. अनेकदा अनौपचारिक गप्पांमध्ये ते वाचत असलेल्या पुस्तकांवर बोलायचे. भैरप्पा यांची ‘पर्व’ ही महाभारतावरील वेगळय़ा धाटणीची कादंबरी त्यांना चांगलीच भावली होती. केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी पुस्तकेही ते आवर्जून वाचत.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

गेल्या ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाल्यानंतर तेराव्या विधानसभेत निवडून आलेल्या तीन आमदारांचे आतापर्यंत निधन झाले आहे.
****
निवडणुकीनंतर लगेचच मुखेडमध्ये निवडून आलेले भाजपचे गोविंदराव राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
****
वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांचे गेल्याच महिन्यात दीर्घ आजाराने निधन झाले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले.