25 January 2021

News Flash

एसटी मालवाहतुकीच्या दरात ४ रुपयांची वाढ

इंधन दरवाढीचा फटका

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे आर्थिक उत्पन्न बुडालेल्या एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे संकट ओढावले आहे. वाढत्या डिझेल दरामुळे महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ११ जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होईल. नवीन दरानुसार मालवाहतुकीसाठी प्रति किमी ४२ रुपये दर आकारला जाणार आहे.

महामंडळाला डिझेलचा पुरवठा दोन बडय़ा इंधन कंपन्यांकडून होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला दिवसाला १ लाख लिटर डिझेल लागत असून, डिझेल खरेदीसाठी वर्षांला ३ हजार कोटींची तरतूद के ली जाते.

टाळेबंदीत प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू केली.
१ हजार १२५ प्रवासी एसटी गाडय़ांमध्ये बदल करून त्याचे मालवाहतूक ट्रक तयार केले आहेत. सध्या त्यांच्या ६२ हजार फेऱ्या होत असून ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने महामंडळाने अखेर मालवाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

– १०० किमीच्या आतील मालवाहतुकीसाठी एसटीला मोठा प्रतिसाद आहे.

– एकेरी मालवाहतुकीचा दर प्रति किमी किमान ४२ रुपये आकारण्यात येत असून, प्रतिदिवस मालवाहतुकीसाठी ३,५०० रुपये भाडे निश्चित केले आहे.

– १०१ किमी ते २५० किमीपर्यंत प्रति किमी ४०, तर २५१ किमीच्या पुढे ३८ रुपये प्रति किमी दर आकारण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 2:00 am

Web Title: rs 4 increase in st freight rates mppg 94
Next Stories
1 मराठा आरक्षणप्रश्नी केंद्राने भूमिका स्पष्ट करावी!
2 लोकलचा निर्णय मंगळवारपर्यंत
3 ‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात पाच टक्के सवलत
Just Now!
X