एसटीच्या कु र्ला-नेहरूनगर आगारात केंद्र; केवळ निविदा प्रक्रियेचेच काम

मुंबई : वाहनांच्या तपासणीत सुसूत्रता यावी यासाठी एसटीच्या कु र्ला-नेहरूनगर आगारात परिवहन विभागाकडून आरटीओचे अद्ययावत स्वयंचलित तपासणी केंद्र उभारण्यात येणार होते; परंतु गेल्या तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रियेपलीकडे हे काम पुढे सरकलेले नाही. परिणामी, वर्षभरात केंद्र उभारणीचे स्वप्नभंग होण्याची चिन्हे आहे.

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाडय़ा यासह अन्य व्यावसायिक व अवजड वाहनांची आरटीओत तपासणी होते. प्रथम नवीन वाहन नोंदणी करताना तपासणी होते. त्यानंतर दुसरी तपासणी दोन वर्षांनी आणि मग दरवर्षी तपासणी केली जाते. ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेंशन, चाक, वेग, हेडलाइट इत्यादींची तपासणी केली जाते. मात्र कर्मचाऱ्यांकडून के ल्या जाणाऱ्या वाहन तपासणीसाठी बराच वेळ लागतो. याशिवाय तपासणीत सुसूत्रताही येत नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही वाहन तपासणीसाठी २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक असल्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार मुंबईतील आरटीओत वाहन तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक उभारण्याची कार्यवाही सुरूही आहे.

परिवहन विभागाकडून ऑक्टोबर २०१५ मध्ये नाशिकमधील पंचवटी परिसरात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानुसारच मुंबईतील एसटी महामंडळाच्या कुर्ला आगारातही अशीच यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रि याच सुरू असून त्यापुढे हे काम सरकलेले नाही. त्यामुळे केंद्र उभारणीसाठी विलंबच होणार आहे. कुर्ला आगाराचा परिसर खूपच मोठा असून सध्या एसटी गाडय़ांच्या परिचालनाशिवाय अन्य कामे येथे नाहीत. स्वयंचलित केंद्र उभे राहिल्यास दिवसाला जवळपास २०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी होईल. मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांची तपासणी बारकाईने होणार असून स्वयंचलित तपासणी यंत्र, टेस्ट ट्रॅक याशिवाय अन्य मोठी यंत्रणा उभारली जाईल. साधारण वर्षभरात केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी १४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

११ ठिकाणी केंद्रे

राज्यात परिवहन विभागाकडून आणखी ११ ठिकाणी अशाच प्रकारचे तपासणी केंद्र येत्या दीड वर्षांत उभारण्याचे उद्दिष्ट आहे.  मुंबईतील एसटीच्या कुर्ला नेहरू नगर आगाराबरोबरच ताडदेव, ठाण्यातील मर्फी, कल्याणमधील नांदिवली, पनवेलमधील तळोजा, नागपूरमधील हिंगणा, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, पुण्यातील दिवे घाट, तर कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती येथे ही यंत्रणा उभारण्याचा मानस आहे.