News Flash

गणेश मंडळांसाठी नियमावली

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पालिकेने आता घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

गणेश मंडळांसाठी नियमावली

लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या दहा कार्यकर्त्यांचाच गणेश विसर्जनात सहभाग; मिरवणुकीला परवानगी नाही

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना पालिकेने आता घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. गतवर्षांप्रमाणेच यंदाही अनके  निर्बंध कायम ठेवण्यात आले असून लशीच्या दोन मात्रांचा नियम यावेळी नियमावलीत नव्याने अंतर्भूत करण्यात आला आहे. दोन लस मात्रा घेतलेल्या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य द्यावे, अशी अट घालण्यात आली आहे.

सार्वजनिक मंडळांना आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाइन, के बल नेटवर्क, फे सबुक, समाजमाध्यमे यांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असाही नियम घालण्यात आला आहे.

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना अनेक नियम पाळावे लागणार आहेत. गेल्या वर्षी पालिकेने सार्वजनिक मंडळांना जे नियम घातले होते ते सर्व नियम यावर्षीही लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही प्रशासनाने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरी गणेशमूर्ती आणणाऱ्यांकरिता ही नियमावली बंधनकारक असणार आहे. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा, तर सार्वजनिक उत्सवातील मूर्ती चार फुटांपेक्षा उंच नसावी हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.

नियमावली काय?

  • गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर आदी करोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे अनिवार्य आहे.
  • घरगुती गणेशमूर्तीचे आगमन मिरवणुकीच्या स्वरुपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त पाच व्यक्तींचा समूह असावा. शक्यतो या व्यक्तींनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात.
  • घरगुती मूर्ती शक्यतो धातूची किं वा संगमरवराची असावी आणि त्याचे घरीच प्रतीकात्मक विसर्जन करावे. शाडूची मूर्ती असल्यास घरच्या घरीच बादलीत विसर्जन करावे. शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम तलावावर विसर्जन करावे.
  • विसर्जनालाही मिरवणुकीने जाऊ नये. घरगुती विसर्जनाच्या वेळी चाळीतील, इमारतीतील सर्व मूर्ती एकत्रितरित्या नेऊ नयेत.
  • विसर्जनाच्या वेळी केली जाणारी आरती व पूजा घरीच करावी.
  • प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक मंडळांनी गणपतीचे विसर्जन मंडपातच करावे किं वा पुढे ढकलावे, तर प्रतिबंधित इमारतीतील घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करायचे आहे.

विसर्जनाचे वाहन धीम्या गतीने नको!

सार्वजनिक गणेशमूर्तीच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या वेळी १० पेक्षा अधिक कार्यकर्ते असू नयेत. या कार्यकर्त्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन पंधरा दिवस झालेले असावेत. सार्वजनिक मंडळांनी हार, फु ले यांचा कमी वापर करून निर्माल्याचे प्रमाण कमीत कमी तयार होईल याची काळजी घेण्याबाबतही सांगण्यात आले आहे. तसेच विसर्जनासाठीचे वाहन धीम्या गतीने नेऊ नये, अशीही नवीन अट घालण्यात आली आहे. तसेच विसर्जनादरम्यान भक्तांना दर्शन घेऊ देणे आणि पूजा करू देणे यालाही मनाई करण्यात आली आहे.

१७३ कृत्रिम तलाव

गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी यंदा पालिके ने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. यावेळी १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत, तर ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्थळे आहेत. तसेच काही विभागांतर्गत मूर्ती संकलन केंद्रही स्थापन करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 12:46 am

Web Title: rules for ganesh mandals vaccination coronavirus ssh 93
Next Stories
1 सीएसएमटी पुनर्विकासाला गती
2 वाईट हवेबाबत इशारा देणारी यंत्रणा उभारण्याची मागणी
3 गुरुवारी केवळ दुसऱ्या मात्राधारकांसाठी लसीकरण
Just Now!
X