16 December 2017

News Flash

पोलिसांच्या तावडीतून पळताना रेल्वेखाली सापडून मृत्यू

पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना एका आरोपीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी

प्रतिनिधी, मुंबई | Updated: April 19, 2014 1:07 AM

पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना एका आरोपीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी वडाळा येथे ही दुर्घटना घडली.
 चोरीच्या एका गुन्ह्यामध्ये वडाळा रेल्वे पोलिसांनी अ‍ॅग्नेलो वाल्डीर (२५) याला बुधवारी अटक केली होती. तो रे रोड येथे राहणारा होता. वडाळा रेल्वे पोलिसांकडे पोलीस कोठडी नसल्याने त्यांनी अ‍ॅग्नेलो याला कुर्ला रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ठेवले होते. शुक्रवारी त्याला भोईवाडा येथे सुटीच्या न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यामुळे त्याला कुर्ला कोठडीतून पुन्हा वडाळा येथे आणले. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास त्याने बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळ काढला. यानंतर सरळ रेल्वे मार्गावर शिवडीच्या दिशेने पळू लागला. परंतु त्याचेवळी बेलापूर डाऊन लोकल येत होती. त्या लोकलच्या धडकेने तो खाली पडला. उपचारासाठी त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. परंतु पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

First Published on April 19, 2014 1:07 am

Web Title: run away from police dead on railway track