News Flash

एस.टी. तर्फे सोमवारपासून महिलांसाठी विशेष बस सेवा

परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगर क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पनवेल, डोंबिवली, विरार येथून, येत्या सोमवारपासून एसटी बसेस सुरू करण्यात येत आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

मंत्री ॲड.परब म्हणाले की माननीय महिला आणि बालविकास मंत्री ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत विनंती केली होती . त्यानुसार मंत्रालय व इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेच्या सोयी नुसार पनवेल-मंत्रालय (८:१५/१७:४५), डोंबिवली-मंत्रालय(८:१५/१७:३५) व विरार-मंत्रालय (७:४५/१७:३५) या मार्गावर सोमवार दिनांक २१ सप्टेंबर पासून बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


									

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 9:27 pm

Web Title: s t special bus service for women from monday scj 81
Next Stories
1 इंदू मिलवरुन राजकारण करू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन
2 दिशाने शेवटचा कॉल पोलिसांना लावला होता का?; जाणून घ्या सत्य..
3 मुखपट्टी, सॅनिटायझरच्या मागणीत घट
Just Now!
X