News Flash

सचिन तेंडूलकर सहकुटुंब ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला

मंडळाच्यावतीने मानचिन्ह देऊन सत्कार

सचिन तेंडूलकर सहकुटुंब ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला
मुंबई : 'लालबागचा राजा' गणेश मंडळाकडून सचिन तेंडूलकरचा सत्कार करण्यात आला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सहकुटुंब आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी गणेश मंडळाच्यावतीने त्याचा मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला.

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते. आजवर अनेक सेलिब्रिटिंनी देखील राजाचे दर्शन घेतले आहे. आता दरवर्षी ते न चुकता दर्शनासाठी येतातच. या सेलिब्रेटिंमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील सहपरिवार राजाचे दर्शन घेतले आहे. तसेच अजय देवगन, कंगना राणावत, अनिल कपूर, सोनम कपूर, तमन्ना भाटीया, संजय दत्त यांसारख्यांचा यात समावेश आहे.

राजावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या एका भाविकाने कालच ‘लालबागचा राजा’च्या चरणी तब्बल १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या गणपती आणि लक्ष्मीच्या भरीव सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्या आहेत. या मूर्तींची किंमत ३१ लाख ५१ हजार रुपये आहे. त्याचबरोबर दर्दशनासाठी ररोज भाविकांची रिघ ही लागलेलीच असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 2:25 pm

Web Title: sachin tendulkar at the lalbag cha raja ganesh mandal
Next Stories
1 माहीम येथील रेल्वे अपघाताची चौकशी
2 विद्यापीठाचा निकाल हवाय?..  मग हजेरीचे पुरावे आणा!
3 जागर स्त्रीशक्तीचा, शोध ‘नवदुर्गाचा’!
Just Now!
X