चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. गुढीपाडव्याला मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मराठी बांधव दरवर्षी उत्सुक असतात. त्यात सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील मोठ्या आनंदाने घरी गुढी उभारतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मुंबईतील राहत्या घरी पत्नी अंजली आणि कुटुंबियांसोबत गुढी उभारली. पत्नी अंजलीसोबत गुढी उभारतानाचा व्हिडिओ सचिनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केला आहे. या व्हिडिओसह सचिनने तमाम मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या.

व्हिडिओ-

A very happy Gudi Padwa and Ugadi to one and all!

Posted by Sachin Tendulkar on Friday, April 8, 2016