News Flash

रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना सचिनची आर्थिक मदत

NGO ला केली आर्थिक मदत

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात मजूर-कामगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. समाजातील अनेक महत्वाच्या व्यक्ती या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना आर्थिक मदत केली आहे. यात मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांचाही समावेश आहे.

सचिनने High5 या NGO ला ही आर्थिक मदत केली आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या संस्थेला शुभेच्छा देत, गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आपण छोटीशी मदत करत असल्याचं सांगितलं आहे. याआधीही सचिनने मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. याआधीही सचिनने मुंबईत ५ हजार लोकांच्या अन्न-धान्याची सोय केली होती. याचसोबत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थाच्या करोनाविरुद्ध लढ्यात सचिन सहभागी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:38 pm

Web Title: sachin tendulkar comes forward to support 4000 underprivileged people amid coronavirus pandemic psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धारावीची नस ओळखलेला अधिकारी महापालिकेच्या आयुक्तपदी, जाणून घ्या कोण आहेत इक्बाल चहल??
2 दगडी चाळीत असं पार पडलं अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींच्या मुलीचं लग्न
3 ‘मुंबईचा राजा’: लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवासंबंधी घेतला महत्वाचा निर्णय
Just Now!
X