News Flash

सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात असून या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण असून सचिन तेंडुलकरच्या या भेटीमागे काही राजकीय कारण तर नव्हतं ना अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. मात्र या भेटीसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचला होती. दोघांमध्ये 10.45 ते 11.15 अशी अर्धा तास चर्चा सुरु होती. ही भेट पूर्वनियोजित असल्याचं सांगितलं जात आहे. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचं कळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2019 12:45 pm

Web Title: sachin tendulkar meets sharad pawar
Next Stories
1 यंदा मुंबईचा कौल कोणाला?
2 पश्चिम रेल्वेवर आज, तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक
3 ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ आज ठरणार!
Just Now!
X