News Flash

“…असं केल्यानं बराच त्रास कमी होईल”; वाढदिवसानिमित्त सचिनचं चाहत्यांना आवाहन

करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४८ वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरला आज ४८ वर्षे पूर्ण होत असून ४९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये झाला होता. नुकताच करोनावर मात करुन घरी परतलेल्या सचिननं चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून खास विनंती केली आहे. तसेच वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार व्यक्त केले आहेत.

‘तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. मागचा महिना माझ्यासाठी खूप अडचणीचा होता. करोना पॉझिटीव्ह असल्याने २१ दिवस आयसोलेशनमध्ये होतो. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे आणि डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे मी करोनावर मात केली. या दरम्यान मला डॉक्टरांनी एक विनंती केली. ती विनंती मी तुम्हा सर्वांना करत आहे. गेल्या वर्षी मी प्लाझ्मा डोनेशन केंद्राचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी एक संदेश दिला होता. जर प्लाझ्मा योग्य वेळेत डोनेट केला तर रुग्ण लवकर बरा होतो. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी प्लाझ्मा डोनेट करणार आहे.याबाबत मी डॉक्टरांशी बोलत आहे.तुम्हीही करोनावर मात करुन बरे झाला असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्लाझ्मा डोनेट करा. यामुळे खूप अडचणी दूर होतील. त्यामुळे माझी मनापासून विनंती आहे की, रक्तदान करा आणि रुग्णांचे जीव वाचवा’, अशी विनंती सचिननं ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत केली आहे.

गेल्या महिन्यात रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिकेत सहभागी झालेल्या सचिनच्या करोना चाचणीचा अहवाल २७ मार्चला सकारात्मक आला होता. मागील काही दिवसांपासून सचिन होम क्वारंटाइन होता. मात्र डॉक्टरांच्या सल्लानुसार त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खबरदारी म्हणून २ एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनावरील उपचारांसाठीच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनावर मात करून सचिन आता घरी परतला आहे.

Happy Birthday Sachin : मुंबईकर अवलिया फॅनच्या सचिनला हटके शुभेच्छा!

सचिन त्याच्या कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळला असून त्यात ३२९ डाव खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने ५३.७९ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या. यात ६ दुहेरी शतकं, ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. संपूर्ण कसोटी कारकिर्दीत सचिनने २,०५८ चौकार आणि ६९ षटकार मारले आहेत. त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी कायम स्मरणात राहणारी आहे. सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला. त्यात त्याने १८,४२६ धावा केल्या. यात एक द्विशतक, ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याने एकूण २०१६ चौकार आणि १९५ षटकार ठोकले आहेत. सचिन त्याच्या कारकिर्दीत एकच आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला. तर आयपीएलमध्ये सचिननं ७८ सामने खेळले. त्यात १ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 4:01 pm

Web Title: sachin tendulkar thanked everyone and requested to donate plasma rmt 84
Next Stories
1 VIDEO : आर्चर, कमिन्स आणि रबाडा यांना सचिन कसा खेळला असता?
2 Happy Birthday Sachin : मुंबईकर अवलिया फॅनच्या सचिनला हटके शुभेच्छा!
3 बार्सिलोनाचा सुपर लीगला पाठिंबा कायम
Just Now!
X