मुंबईच्या आयकर न्यायाधिकरण विभागाने (ITAT) ट्रक्स प्रकरणामध्ये सचिन तेंडुलकरच्या बाजुने निर्णय दिला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांमधील सचिनच्या पुण्यातील फ्लॅटमधून मिळणारे उत्पन्न शुन्य असल्याचे आयटीएटीने मानले आहे. त्यामुळे सचिन तेंडुलरकराला १.३ लाख रूपये आता भरावे लागणार नाहीत.

सचिन तेंडुलकरने २०१२-१३ या आर्थिक वर्षांमध्ये ६१.२३ कोटींची कमाई केल्याचे आयटीएटीने गेल्या आठवड्यात काढलेल्या ऑर्डरमध्ये म्हटले होते. तर २०१२-१३ या आर्थिक वर्षात पुण्यातील फ्लॅटला कोणीही भाडेकरू मिळाला नाही. त्यामुळे त्यामधून कोणतेही उत्पन्न मिळाले नसल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले.

सचिन तेंडुलकरने असा दावा केला की, एका फ्लॅटमधून प्रतिमहिना १५ हजार रूपये भाडे घेतले. आयकर विभागाच्या १९६१ च्या सेक्शन २३(१)(सी) नुसार रिक्तता अलाऊन्स मिळावा. सचिनने आसा दावा केला की, सैफायर पार्कमधील फ्लॅटमधून कोणतीही कमाई झाली नाही. जर आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळाले नसेल तर करदात्याला रिक्तता अलाउन्सनुसार सुट दिली जाते. याच आधारावर आयकर विभागाने सचिन तेंडुलकरचा टॅक्स प्रकरणात सुट दिली आहे.

४५ वर्षीय सचिन तेंडुलकरचे पुण्यात सफायर आणि ट्रेजर पार्क या ठिकाणी दोन फ्लॅट आहेत. आयकर विभागाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीजवळ एकापेक्षा आधिक घर असतील तर तो एक घर स्वता:ला राहण्यासाठी वापर करू शकतो.