News Flash

सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ

अंतरिम अटकपूर्व जामिनाची मागणी फेटाळल्यानंतर ‘एनआयए’कडून चौकशी

(संग्रहित छायाचित्र)

सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामिनाची मागणी, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू असलेली चौकशी आणि साक्षीदारांनी दिलेले विरोधी जबाब या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शके ल, या शक्यतेने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती. मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध के ला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकू न तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले.

शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी के ली. उद्योगपती मुके श अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके  ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती. त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह््याचे पैलू असल्याने एनआयएने दोन दिवसांपूर्वी हिरेन कु टुंबाकडून माहिती घेतली. शनिवारी कु टुंबाला समोर ठेवत वाझे यांच्याकडे चौकशी के ल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

मनसुख यांची स्कॉर्पिओ चार महिने वाझे यांच्या ताब्यात होती, त्यांनी मनसुख यांना या प्रकरणात अटक होण्याबाबत सूचना आणि अन्य तपास यंत्रणांच्या चौकशीचा मनस्ताप होत असल्याबाबत तक्रार करण्याचा सल्ला वाझे यांनीच दिला होता, असा दावा हिरेन कु टुंबाने जबाबात के ला आहे. अन्य साक्षीदारांनी या दाव्यांमध्ये तथ्य असल्याचे जबाबात एटीएस, एनआयएला दिले आहेत. विशेष म्हणजे मनसुख यांचा मृतदेह मिळाला त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांचे निवासस्थान, दुकानाभोवती असलेल्या सीसीटीव्हींचे चित्रण डीव्हीआरसह ताब्यात घेतल्याचा दावा कु टुंबाने या दोन यंत्रणांकडे के ला आहे. हे चित्रण गुन्हे शाखेने का ताब्यात घेतले, मनसुख यांच्यासोबत असलेली अनेक वर्षांची मैत्री का दडविली आदी प्रश्न एनआयएने वाझे यांना विचारल्याचे समजते.

एकाचवेळी दोन ठिकाणी अस्तित्व?

एटीएसने केलेल्या तपासात ४ मार्चला रात्री घरातून बाहेर पडलेल्या मनसुख यांच्या मोबाईलचे अस्तित्व एकाचवेळी वसई, तुंगारेश्वार येथील दोन भिन्न ठिकाणांवर आढळल्याची माहिती मिळते. पत्नाी विमला यांनी दिलेल्या जबाबानुसार तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगत मनसुख यांनी घर सोडले होते. घराबाहेर पडताच मनसुख यांनी रिक्षा पकडली. मात्र ते या रिक्षाने घोडबंदरला न जाता तिथल्या तिथेच साधारण दोन किलोमिटरच्या परिघात घुटमळले. त्यानंतर ठाण्यापासून वसई-तुंगारेश्वारपर्यंत घडलेला घटनाक्र म आणि मनसुख यांचा मोबाइलचा या दोन्ही यंत्रणा शोध घेत आहेत.

चोरीचा बनाव?

मनसुख घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी होती. मात्र त्यांचा मृतदेह सापडला तेव्हा चेहऱ्यावर न वापरलेल्या पाच ते सहा रुमालांच्या घड्या होत्या. त्यांचे मनगटी घड्याळ, पुष्कराज खड्याची अंगठी, पैशांचे पाकीट, डेबीट-क्रेडिट कार्ड, पैसे आणि मोबाइल यापैकी एकही वस्तू मृतदेहासोबत नव्हती. या सर्व वस्तू गायब करून चोरीच्या उद्देशाने मनसुख यांची हत्या करण्यात आली, असा बनाव रचण्यात आल्याचा संशय तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात.

‘जगाला अलविदा करण्याची वेळ समीप’

उद्योगपती मुकेश अंबानी यांना मिळालेली धमकी, मनसुख हिरेन यांची हत्या या प्रकरणांत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सचिन वाझे यांनी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयएस) चौकशीला सामोरे जाण्याआधी भावनिक मजकू र व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे सर्वदूर पसरवला. मला वाटते जगाचा निरोप घेण्याची (टू से गुडबाय टू दी वर्ल्ड) वेळ जवळ येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:41 am

Web Title: sachin vaze difficulty increases abn 97
Next Stories
1 औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’च्या अखत्यारीतून वगळले
2 उन्हाचे चटके तीव्र
3 अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंडमध्ये रुग्णवाढ
Just Now!
X