News Flash

Antilia Bomb Scare Case : सचिन वाझेंच्या NIA कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ!

सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

सचिन वाझे

अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा NIA तपास करत आहे. या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीमध्ये आहेत. त्यांची कोठडी संपल्यामुळे आज त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केलं. अधिक तपासासाठी एनआयएकडून सचिन वाझेंच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करत विशेष एनआयए कोर्टाने सचिन वाझेंची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील एनआयए करत असत असून त्या प्रकरणी देखील सचिन वाझेंची चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक खुलासे झाल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलं आहे.

 

काही दिवसांपूर्वीच ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश महाराष्ट्र एटीएसला दिले होते. त्यानुसार हा तपास आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले दोन आरोपी यांना एनआयएला हस्तांतरीत करण्यात आलं.

आधी अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझेंविरोधात एनआयएला पुरावे मिळाल्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सचिन वाझेंचाच हात असल्याची बाब समोर आली आहे. सचिन वाझे यांच्याशी संबंधित या प्रकरणातील ७ ते ८ कार एनआयएनं ताब्यात घेतल्या आहेत. याशिवा, या प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक शिंदे आणि बुकी अशा दोघांनीही या प्रकरणात सचिन वाझेंचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यासोबतच, जिलेटिनच्या कांड्या सापडलेली कार हरवल्याची माहिती मनसुख हिरेन यांनी पोलीस जबाबात दिली होती. पण ती कार स्वत: मनसुख हिरेन यांनीच सचिन वाझेंना दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एनआयएला तपासामध्ये मिठी नदीमध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील सापडल्या आहेत. या पुराव्यांमधून सचिन वाझेंचा प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट होत असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. याशिवाय, तपास एनआयएकडे जाण्याच्या भितीनेच सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याच्या निष्कर्षाप्रत एनआयए आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 4:46 pm

Web Title: sachin vaze mumbai police nia custody increased by court 7 april pmw 88
टॅग : Crime News
Next Stories
1 मीरा-भाईंदर: स्वयंघोषित धर्मगुरूचा १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
2 “सचिन वाझे जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं”
3 “म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत!” आनंद महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं!
Just Now!
X