News Flash

बेहिशेबी बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे, DNA चाचणीची प्रतिक्षा…वाचा काय सांगितलं NIAनं कोर्टात!

"मला बळीचा बकरा बनवलं जातंय", अशी तक्रार सचिन वाझेंनी न्यायालयात केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची आज विशेष एनआयए न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत पुन्हा एनआयएच्या कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात एनआयएनं आत्तापर्यंत केलेल्या तपासातील काही मुद्दे आज न्यायालयात ठेऊन त्यासंदर्भात पुढील तपास करण्यासाठी सचिन वाझे यांची कोठडी मागितली होती. एनआयएची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. यावेळी सचिन वाझेंकडच्या बेहिशेबी ६२ बुलेट्स, वाझे-हिरेन भेटीचे पुरावे अशा अनेक गोष्टी एनआयएनं न्यायालयासमोर ठेवल्याचं वृत्त एनटीडीव्हीनं दिलं आहे.

वाझेंच्या घरी ६२ बेहिशेबी बुलेट्स सापडल्या!

‘सचिन वाझे यांच्या घरी अशा ६२ बुलेट्स सापडल्या, ज्यांचा कोणताही हिशोब त्यांच्याकडे नव्हता. तसेच, त्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसाठी देण्यात आलेल्या ३० बुलेट्सपैकी फक्त ५ बुलेट्स सापडल्या असून उरलेल्या २५ बुलेट्स कुठे गेल्या, हे वाझेंना माहीत नसल्याचं एनआयएनं कोर्टात नमूद केल्याचं’ या वृत्तात म्हटलं आहे. तसेच, ‘१७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, याच वेळी मनसुख हिरेनने सचिन वाझेंना कारची चावी दिली, जी चोरीला गेल्याचा दावा त्यांनी नंतर केला होता’, असं देखील एनआयएनं यावेळी न्यायालयाला सांगितलं. एनआयएनं डीएनए टेस्टसाठी मनसुख हिरेन यांचे रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणात सापडलेल्या गाड्यांमधून देखील नमूने गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून नवीन गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Antilia Explosive Case : सचिन वाझेंची ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडीत रवानगी!

“मला बळीचा बकरा बनवलं जातंय”

दरम्यान, यावेळी न्यायालयात सचिन वाझे यांनी “मला बळीचा बकरा बनवलं जात आहे”, असा दावा केला. “मी तपासात सहकार्य करत असून मला पुन्हा कोठडीत पाठवलं जाऊ नये”, असं देखील सचिन वाझेंनी न्यायालयात नमूद केलं. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत त्यांची पुन्हा कोठडीत रवानगी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 5:58 pm

Web Title: sachin vaze sent nia custody claims being made scapegoat in ambani bomb scare case pmw 88
Next Stories
1 Antilia Explosive Case : सचिन वाझेंची ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडीत रवानगी!
2 करोना चाचणीची धास्ती
3 ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य दूरच
Just Now!
X