26 September 2020

News Flash

अभिनेत्री साधना कालवश

नायिका म्हणून आपली सुंदर प्रतिमा चाहत्यांच्या मनात कायम रहावी

अभिनेत्री साधना

बोलके डोळे, चेहऱ्यावरचा निरागस भाव, ठाशीव बोलणे या बळावर साठच्या दशकात हिंदूी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या साधना शिवदासांनी यांचे शुक्रवारी हिंदुजा रूग्णालयात निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
नायिका म्हणून आपली सुंदर प्रतिमा चाहत्यांच्या मनात कायम रहावी, या इच्छेने गेली अनेक वर्ष प्रसिद्धी माध्यमांपासूनही दूर राहिलेल्या साधना या राहत्या घराच्या वादातून काही महिन्यांपूर्वीच माध्यमांसमोर आल्या होत्या. त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘मेरे मेहबूब’, ‘मेरा साया’, ‘वक्त’, ‘लव्ह इन सिमला’ सारख्या चित्रपटांमधून आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. ‘गीता मेरा नाम’ आणि ‘पती परमेश्वर’ हे चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यांच्यावर शनिवारी दुपारी १२ वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:44 am

Web Title: sadhana bollywood star and style icon passes away at 74
Next Stories
1 पोलीस आयुक्तांच्या नव्या प्रशासकीय कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन
2 पूर्व मुक्त मार्गाच्या पोकळीत अल्पवयीन मुलाचा सांगाडा
3 आता पालिका अधिकारी गाळात!
Just Now!
X