24 February 2021

News Flash

साध्वी प्रज्ञासिंहच्या जामिनाला विरोध

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला जामीन देऊ नये

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला जामीन देऊ नये आणि ज्या आधारे ती जामिनाची मागणी करते आहे त्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र रद्द करण्याची मागणी या स्फोटामधील पीडित व्यक्तीने बुधवारी विशेष न्यायालयात केली.
निसार अहमद सय्यद बिलाल (६४) या व्यावसायिकाने प्रज्ञासिंह हिच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला आहे. ‘जमात-ए-उलेमा महाराष्ट्र’ या संस्थेच्या माध्यामातून त्याने ही मागणी केली आहे. प्रज्ञासिंह हिच्यासह शिवनारायण कालसंगरा, श्याम साहू आणि प्रवीण तक्काल्की अशा चौघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या चौघांविरोधात पुरावे आढळलेले नाहीत, असे ‘एनआयए’ने पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर या चौघांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामिनाला विरोध नसल्याची भूमिकाही ‘एनआयए’ने विशेष न्यायालयात स्पष्ट केली आहे. ‘एनआयए’ने राजकीय दबावाखाली हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 12:46 am

Web Title: sadhvi pragya singh thakur malegaon blast case
Next Stories
1 बेकायदा बांधकामांप्रकरणी न्यायालयाचा दिघावासीयांना तडाखा
2 ‘त्या’ पदांवर मराठा उमेदवारांचीच भरती करण्याची मागणी
3 रेल्वेचे निमंत्रण उशिरा मिळाल्याने शिवसेना खासदार नाराज
Just Now!
X