News Flash

नायरमध्ये १००१ करोनाबाधित मातांची सुखरूप प्रसूती

गेल्या वर्षभरात झालेल्या १००१ प्रसूतींपैकी ५९९ प्रसूती सर्वसाधारण पद्धतीने झाल्या आहेत.

मुंबई : पालिकेचे नायर रुग्णालय करोना रुग्णालय घोषित झाल्यापासून वर्षभराच्या कालावधीत येथे १००१ करोनाबाधित महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. जन्माला आलेल्या १०२२ बाळांमध्ये एका तिळ्यासह १९ जुळ्यांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या वर्षभरातील कामगिरीचे शास्त्रशुद्ध दस्तावेजीकरण व वैद्यकीय संशोधन लेखन करण्याचे काम सुरू आहे.

करोनाबाधित मातांच्या प्रसूतीसाठी आणि नवजात बालकांच्या सेवेसाठी गेले वर्षभर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘नवजात शिशू व बालरोग चिकित्सा विभागा’तील ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा व ‘प्रसूतिशास्त्र विभागा’तील ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आणि ‘भूलशास्त्र विभागा’तील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पीपीई किट घालून सलग ६ तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले. या तिन्ही विभागांतील अनेक डॉक्टर्स, परिचारिका यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा अनेक दिवस घरी न जाता रुग्णालयात राहून अविरतपणे रुग्णसेवेचे काम केले आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या १००१ प्रसूतींपैकी ५९९ प्रसूती सर्वसाधारण पद्धतीने झाल्या आहेत.

उर्वरित ४०२ प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाल्या आहेत. ‘आई करोनाबाधित असल्यामुळे पोटातल्या बाळाला करोनाचा संसर्ग होत नाही; मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपर्कात येऊन बाळाला करोनाचा संसर्ग होऊ शकतो.

नायरमध्ये जन्मलेल्या १ हजार २२ बालकांपैकी काही जण करोनाबाधित आढळले होते; मात्र त्यांना करोनाची लक्षणे नव्हती. दुसऱ्या चाचणीत करोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच या बालकांना घरी सोडण्यात आले,’ अशी माहिती नवजात शिशू व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:08 am

Web Title: safe delivery affected mothers in nair hospital akp 94
Next Stories
1 बालसंग्रहालय ऑनलाइन व्यासपीठावर
2 रुग्णालयांत जेवण, नाश्त्यासाठी सात कोटींचा खर्च
3 “…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले”, अनिल देशमुखांचा माजी पोलीस आयुक्तांवर निशाणा!
Just Now!
X