21 September 2020

News Flash

मरणोत्तर अवयवदान, प्रत्यारोपणात घट

करोनाकाळात अवघ्या २७ अवयवांचे सुरक्षित प्रत्यारोपण

करोनाकाळात अवघ्या २७ अवयवांचे सुरक्षित प्रत्यारोपण

मुंबई : करोना उद्रेकामुळे मरणोत्तर अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. टाळेबंदी सुरू झाल्यापासून मुंबई शहरात केवळ १० मेंदूमृत दात्यांचे अवयवदान झाले. २०१९ मध्ये शहरात ७९ दात्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेत अवयवदान केले होते, तर यंदा अर्धे वर्ष सरले तरी दात्यांची संख्या के वळ १० पर्यंत पोहोचली आहे.

मार्च ते जुलै या काळात दहा दात्यांच्या अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये एकही दाता किंवा प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झालेला नाही. यात जवळपास ३७० डॉक्टरांपासून आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. यापैकी कोणालाही संसर्ग झालेला नाही.

पात्र दात्याचे निदान झाल्यानंतर मृत्यू होण्याच्या २८ दिवस आधी करोनाबाधितांच्या संपर्कात आला होता का, याची खात्री केली जाते. यासाठी नातेवाईकांशी चर्चा करून २८ दिवसांत दात्यांच्या संपर्कात आलेल्यांची यादी केली जाते. दात्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. आरटीपीसीआर चाचणी पूर्णत: अचूक नसल्याने छातीमध्ये संसर्ग आहे का, याची तपासणी सिटी स्कॅनद्वारे केली जाते. हे सर्व निकष पाहूनच अवयवदानास परवानगी दिली जाते. तसेच प्रत्यारोपण करण्यात येणाऱ्या रुग्णाच्याही चाचण्या केल्या जातात. तेव्हा करोनाच्या भीतीने अवयवदान किंवा प्रत्यारोपणाची प्रक्रिया खंडित होणार नाही यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर यांनी सांगितले. दहा दात्यांनी करोनाकाळातही अवयवदान केल्याने २९ अवयव प्राप्त झाले. यातील २७ अवयवांचे प्रत्यारोपण झाले असून संबंधित रुग्णांना जीवनदान मिळाले. मात्र अद्यापही अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे.

रुग्णालयांचाही अल्प प्रतिसाद

शहरात प्रत्यारोपणासाठी ३८ रुग्णालयांना परवानगी असून यातील १३ रुग्णालयांनी प्रत्यारोपण करण्याची तयारी दर्शविली आहे, तर १९ रुग्णालये मात्र अजूनही यासाठी तयार नाहीत. सहा रुग्णालयांनी अजून निश्चित ठरविलेले नाही.

मार्च ते जुलैमध्ये दान झालेले अवयव

’ मूत्रपिंड- १४ ’  यकृत- १० ’ हृदय- १ ’ फुप्फुस- १ ’ स्वादुपिंड- १

अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी

’ मूत्रपिंड- ३५३६ ’  हृदय- २७ ’ यकृत- ३५० ’ फुप्फुस- १४ स्वादुपिंड- १०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:04 am

Web Title: safe transplantation of 27 organs in the coronal period zws 70
Next Stories
1 ईशान्य मुंबईत रुग्णसंख्येत घट
2 मुंबईमधील तिसरा सार्वजनिक गणेशोत्सव सव्वाशे वर्षांचा!
3 डोंगरी, मशीद बंदरमध्ये रुग्णवाढ
Just Now!
X