22 November 2017

News Flash

नवी मुंबई महापौरपदी सागर नाईक

शिवसेनेच्या सतीश रामाणे यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची पुन्हा एकदा नवी मुंबई

मुंबई | Updated: November 26, 2012 2:19 AM

शिवसेनेच्या सतीश रामाणे यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे.
महापौरपदासाठी आज (सोमवार) झालेल्या फेरनिवडणूकीत सागर नाईक यांना ५८ मतं, तर सतीश रामाणे यांना अवघी १५ मतं मिळाली. नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद हे ओबीसींसाठी राखीव आहे. मात्र,  एकाही उमेदवारानं जात पडताळणीचा अर्ज दाखल न केल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. याआधी ९ नोव्हेंबरला महापौरपदाची निवडणूक झाली होती. ही निवडणूक बेकायदा स्थगीत केल्याची याचिका विरोधकांनी दाखल केली होती. मात्र, ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आणि चुकीची माहिती दिल्यावरून काँग्रेसचे अमित पाटील यांना पंधरा हजारांचा दंडही ठोठावला. तसेच त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. राष्ट्रवादीकडून सागर नाईक यांचा अर्ज बाद झाल्यानं गणेश नाईक यांची नाचक्की झाली होती.

First Published on November 26, 2012 2:19 am

Web Title: sagar naik is new mayor of navi mumbai municipal corporation