News Flash

सहार रोड मेट्रो स्थानकाचे ४८ टक्के भुयारीकरण पूर्ण

मुख्यमंत्र्यांकडून स्थानकाच्या कामाची पाहणी

सहार रोड मेट्रो स्थानकाचे ४८ टक्के भुयारीकरण पूर्ण
(संग्रहित छायाचित्र)

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या मार्गिकेतील पॅकेज – ६ अंतर्गत येत असलेल्या सहार रोड स्थानकाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली.

सध्या सहार रोड स्थानकाचे भुयारीकरण ४८ टक्के पूर्ण झाले असून पॅकेज -६ चे एकूण ५९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती  मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला.

सहार रोड मेट्रो स्थानकाची लांबी २१८ मीटर असून रुंदी ३० मीटर आहे.  मेट्रो मार्गिकेच्या ट्रॅकचे आंतर बदल व्हावे यासाठी सहार रोड ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानका दरम्यान भूमिगत सीझर क्रॉस ओव्हर  बांधण्यात येणार आहे. २६६ मीटर लांब व १६ मीटर रुंद असलेल्या सीझर क्रॉस ओव्हरचे बांधकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. यावेळी  पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, संचालक एस. के. गुप्ता व श्री आर रामना आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 1:18 am

Web Title: sahar road metro station completed completion of 48 abn 97
Next Stories
1 कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
2 वाहतूक पोलिसाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
3 मुंबईत आजपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कठोर
Just Now!
X