मुंबई : ‘महाराष्ट्र सेवा संघा’च्या ‘न. चिं. केळकर ग्रंथालया’चा ‘साहित्य साधना पुरस्कार’ प्रख्यात रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘क्लोज एन्काऊंटर्स’ पुस्तकाला जाहीर झाला आहे. रुपये १५ हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान सोहळा २१ मार्चला संध्याकाळी ६ वाजता संस्थेच्या सु. ल. गद्रे सभागृहात होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक वामन केंद्रे उपस्थित राहणार आहेत.
मराठी साहित्यातले कथा, कादंबरी, काव्य हे रूढ प्रकार बाजूला सारून वेगळ्या विषयांवर लेखन करणाऱ्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीला साहित्य साधना पुरस्कार दिला जातो. पुरुषोत्तम बेर्डे यांनी आतापर्यंत सहा नाटके लिहिली असून १५ नाटकांचे दिग्दर्शन के ले आहे. ‘क्लोज एन्काऊंटर्स’ या पुस्तकात त्यांनी कामाठीपुऱ्यातील मनजी, पेंटर, आबुभाई, नूर महंमद, गवजीबुवा इत्यादी २४ व्यक्तिचित्रणे रंगवली आहेत. शिवाय अलेक्झांड्रा थिएटर, कासिम बिल्डिंग, अंजनीसूत व्यायाम शाळा इत्यादी वास्तूही त्यांच्या लेखनात डोकावतात. पुस्तकातील चित्रे बेर्डे यांनी स्वत: रेखाटली आहेत. या पुस्तकाला नाटककार जयंत पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
आतापर्यंत भारत सासणे, डॉ. संजय ओक, सुमेध वडावाला, गिरीश कु बेर इत्यादी साहित्यिक साहित्य साधना पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला करोना निर्बंधांमुळे केवळ ५० जणांनाच प्रवेश दिला जाईल. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फे सबुक पेजवर पाहाता येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 1:34 am