दादर पोलीस वसाहतीमधील सैतान चौकीतील एका घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला असून यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला होता. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. मात्र, या भीषण आगीत होरपळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी सावंत असे त्या मुलीचे नाव असल्याचे समजतेय.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला होता. माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या चार गाड्या घटनास्थाळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन दलाला यश आले. सिलिंडरच्या स्फोटोत तीन घरांचे नुकसान झाले आहे.
मुंबईत दादर येथील सैतान चौकी येथे पोलीस वसाहतीत आग, सिलिंडरचा स्फोट (व्हिडिओ: निर्मल हरिदरन) pic.twitter.com/mjYqWmdj9v
— LoksattaLive (@LoksattaLive) May 12, 2019
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 12, 2019 3:22 pm