करोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाला स्थगितीची मागणी करणारी याचिका करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील आपली व्यक्तिगत माहिती काढून टाकण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. माहिती अधिकाराखाली माहिती मागणाऱ्याचे नाव, त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येते. मात्र या विभागाने आपली व्यक्तिगत माहिती अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध केल्याने आपल्याला त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई  देण्याचे  आदेश देण्याची मागणीही गोखले यांनी केली आहे.